Home बुलढाणा शिक्षशिक्षक मतदारसंघ निवडणूक केंद्राची विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी केली पाहणी

शिक्षशिक्षक मतदारसंघ निवडणूक केंद्राची विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी केली पाहणी

347

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

दि.19 नोव्हे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात 14 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात मतदान केंद्र देण्यात आले आहे. त्यापैकी बुलडाणा तहसिल कार्यालयातील मतदान केंद्राची आज 19 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधांची माहिती घेतली. तसेच व्यवस्थेबद्दल चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसिलदार राहुल खंडारे आदी उपस्थित होते.