शेगावात शुक्रवारी “भारतीय संस्कृतीचे जतन प्रत्येकाची *जबाबदारी” विषयावर अविनाशभारतींचे जाहीर व्याख्यान

 

इस्माईल शेख शेगाव

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व आदर्श संस्थांना पुरस्काराचेही वितरण

शेगाव तालुका पत्रकार संघाचे आयोजन

शेगांव: पत्रकार दिन सोहळा २०२३ निमित्त मराठी पत्रकार परिषद संलग्नित शेगांव तालुका पत्रकार संघाचे वतीने २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्ती,जेष्ठ पत्रकार यांचा सन्मान तसेच शहरातील आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था यांना पुरस्कार वितरण आणि प्रसिद्घ व्याख्याते अविनाश भारती यांचे “भारतीय संस्कृतीचे जतन ही प्रत्येकाची जबादारी” या विषयावर जाहीर व्याख्यान मधून प्रबोधनासह हास्याच्या मेजवानीचा.

भव्य कार्यक्रम स्थानिक श्री गणेश प्रस्थ वै.पुरुषोत्तम हरी गणेश पाटील नगर एम एस इ बी चौक शेगांव येथे
आयोजित करण्यात आला आहे

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून खा प्रतापराव जाधव तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ संजय कुटे राहतील.

याप्रसंगी देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आ.अँड आकाश पुंडकर,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, माऊली ग्रुप चे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, मा. नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच, मराठी पत्रकार परिषद चे राज्य उपद्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बर्दे,विभागीय सचिव अमर राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष सतीशआप्पा दुडे, अजय बिल्लारी,प्रदेश प्रतिनिधी नितीन शिरसाठ, रणजितसिह राजपूत , जिल्हा सरचिटणीस संदीप शुक्ला, शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, काँग्रेस चे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, सहकार नेते पांडुरंगदादा पाटील,मा जी प उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, स्वातीताई वाकेकर,दयारामभाऊ वानखडे, भास्करराव पाटील,प्रेसिन्नजित पाटील, शरद अग्रवाल,सुषमाताई शेगोकार, नंदाताई पाउलझगडे,राजाभाऊ भोजने प्रीतिताई शेगोकार, राजेंद्र माळवे,अनंत उंबरकर,कल्पनाताई मसने, यांची उपस्थिती राहणार आहे.

 

तरी या कार्यक्रमास शेगाव शहर व तालुक्यातील नागरिक महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल उंबरकर,विभागीय सचिव राजेश चौधरी , शेगांव तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धनराज ससाणे, कार्याध्यक्ष सतीश अग्रावाल,उपाध्यक्ष संजय ठाकूर ,सचिव मंगेश ढोले, डिजिटल मीडिया परिषद अध्यक्ष सचिन कडूकार ,कार्याध्यक्ष राजकुमार व्यास यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्यानी केले आहे.

“”विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार”
गेल्या दोन दशका पासुन संतनगरीत आपल्या लेखणीतून उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या पत्रकारांचा भव्य सत्कार यावेळी करण्यात येणार आहे यामधे जेष्ठ पत्रकार अरुण चांडक, महेंद्र व्यास,बद्रीप्रसाद अवस्थी,डॉ जयंत खेळकर,संजय सोनोने, नंदु कुळकर्णी,या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच संत नगरीत सतत सेवाभाव व्रुत्ती ने काम करणाऱ्या कै पुरुषोत्तम हरी गणेश पाटिल चँरीटेबल ट्रस्ट ,स्व श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशन, गो ग्रीन फांऊंडेशन,नागरी हक्क संसरक्षण समीती,रोटरी क्लब,श्रध्दांजली फंड,अंजुमन शिक्षण संस्था,बुरूंगले शिक्षण संस्था,शेगांव शिक्षण संस्था तसेच विवेक चांदुरकर, राजुपाटिल मिरगे,नितीन शेगोकार,रामेश्वर थारकर,गजानन साखरपाळे यांचाही सत्कार होणार आहे”

Leave a Comment