Home Breaking News विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews...

विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews )

0
15

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Andolannews:जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांना च जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांना पाठविला आहे.

तसेच बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित मागण्याविषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणा मुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठे धोरण विरोधात प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा बुलढाणा यांनी मा. विजेंद्रकुमार धोंडगे , जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वात दि. 16.07.2024 रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे.

प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, प्रशासकीय बदलीस पात्र तलाठी यांचे समुपदेशन घेऊन बदल्या करणे,विनंती व आपसी बदल्या करणे , जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे .,जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात देणे , प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी /मं.अ.यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी या शिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून तहसील कार्यालय लोणार समोर विदर्भ तलाठी संघ नागपुर -२ यांच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनास श्री. विजेंद्रकुमार धोंडगे जिल्हाध्यक्ष विदर्भ तलाठी संघटना नागपुर -२ जिल्हा शाखा बुलडाणा व श्री शिवानंद वाकदकर जिल्हा सचिव यांनी आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले.सदर धरणे आंदोलनाला श्री.नंदकिशोर मापारी अध्यक्ष शिवछत्र मित्रमंडळ लोणार, प्रा. बळीरामजी

मापारी शिवसेना जिल्हाप्रमुख, पांडुरंग सरकटे शिवसेना शहर प्रमुख,लोणार, श्री.राजुभाऊ मापारी तालुका अध्यक्ष काँग्रेस,डॉ. गोपाल बच्चीरे जिल्हा संघटक शिवसेना (उ.बा. ठ.),श्री साहेबराव पाटोळे काँग्रेस नेते, श्री.भूषण पाटील तहसिलदार लोणार,रामप्रसाद डोळे नायब तहसीलदार,

श्रीमती योगेश्वरी परळीकर नायब तहसिलदार लोणार, यांनी एकदिवसीय धरणे आंदोलनाला भेट देऊन मनोगत व्यक्त केले. विविध पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.

Andolannews :आंदोलनाचे प्रास्ताविक सचिन शेवाळे तर आभार वसुदेव जायभाय यांनी केले.सदर आंदोलनाच्या वेळी आजी माजी पदाधिकारी व लोणार तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सभासद हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here