समाजसेवा हीच ईश्वर सेवा ,असे मानून मराठा पाटील युवक समितीच्या वतीने, यात्रे निमित्त कचरा मय झालेला परिसर केला स्वच्छ.

 

इस्माईल शेख शेगाव

श्री क्षेत्र सखारामपूर, ईलोरा येथे श्री सखाराम महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त, यात्रेत हजारो भाविक मागील दोन दिवसापासून दर्शनाकरिता व यात्रेत आले होते, विविध गावातील दिंडीच्या फळाचे प्रस्थान झाल्यावर संपूर्ण परिसरात कचरा पडला.

असल्यामुळे, सदर कचरामय परिसर मराठा पाटील युवक समिती जळगाव जामोद च्या वतीने, समिती मधील सदस्यांनी हा संपूर्ण परिसर कचरा उचलून ,ट्रॉलीमध्ये टाकून व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करून ,कचरा जाळून संपूर्ण परिसर साफ व स्वच्छ करण्यात आला

, यावेळी जळगाव जामोद मराठा पाटील युवक समिती, तालुक्यातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment