सेंद्रिय खत चोरीप्रकरणी नगरसेवकाची   मुख्याधिकार्‍यांकडे  तक्रार…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये आज दिनांक 14 डिसेंबर रोजी महा विकास आघाडीचे नगरसेवक यांनी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नगरपरिषद जळगाव जामोद वायाळ येथील सेंद्रिय खत गैरअर्जदार यांनी चोरून नेल्याबाबत फौजदारी कारवाई होण्यासाठी मुख्याधिकारी आशिष बोबडे यांना लेखी तक्रार दिली सविस्तर असे की येथील नगर परिषदेमध्ये महा विकास आघाडीचे सदस्य त्यांनी अशी तक्रार दिली की नगरपरिषद जळगाव जामोद मार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचे कंत्राट हे विरबा गिअर्स अकोला यांना देण्यात आले आहे. सदर घनकचरा व्यवस्थापनावर नगर परिषद यांचे नियंत्रणाखाली सर्व कारभार चालू असतो नगरपरिषद जळगाव जामोद हे सदर घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत निर्माण केलेले सेंद्रिय खत विक्री करीत असते परंतु दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटे गैरअर्जदार यांनी ठेकेदाराचे ट्रॅक्टरने वायाळ येथून तारापूर शिवारातील रसलपुर रोडवरील परिक्षित ठाकरे यांच्या शेतामध्ये सेंद्रिय खताची वाहतूक होत असल्याचे अर्जुन घोलप गजानन वाघ श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे, संतोष बोरसे, संजय भुजबळ,युवराज देशमुख, अमर पाचपोर, व पत्रकार तसेच जळगाव जामोद येथील नागरिकांना या विषयी माहिती पडले असता आरोग्य पर्यवेक्षक, घनकचरा व्यवस्थापन पर्यवेक्षक कुमारी पल्लवी इंगळे मुख्याधिकारी डॉक्टर आशिष बोबडे आरोग्य निरीक्षक रामचंद्र चंडाले यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांना सोबत घेऊन त्यांनी अकरा वाजता घटनास्थळावर जाऊन सदर खताची पाहणी केली असता सदर खत हे घनकचरा व्यवस्थापना वरुन तीन ट्रॉली सेंद्रिय खत बॅग ची किंमत रुपये 100 प्रमाणे अंदाजे एक लाख वीस हजार रुपयाचे खत चोरून आणल्याचे घटनास्थळाचा पंचनामा करून सिद्ध झाले त्या संदर्भात सदर गैरअर्जदार जवळ पावती नसल्याचे वरील अधिकाऱ्यांनी सांगितले व सदर बाबीचा पंचनामा केला व त्याठिकाणी उपस्थित असलेले अनिल ढगे यांनी पत्रकार यांना मुलाखत देताना सांगितले की सेंद्रिय खत मी स्वतः ट्रॅक्टरने आणले आहे. व मला खत आणायला परिक्षित ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेतामध्ये खत आणून टाकले आहे.तरीसुद्धा उद्यापर्यंत नगरपरिषद कार्यालयाकडून आरोपी परिक्षित ठाकरे व इतर लोकांविरुद्ध अद्यापर्यत कोणतीही कारवाई केली नाही तसेच मुख्याधिकारी यांनी गैरअर्जदार विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदवून गैरअर्जदार विरुद्ध कडक कारवाई करावी. तसेच कारवाई तीन दिवसाचे आत कारवाई न केल्यास नगर परिषद कार्यालयात घेराव टाकून आंदोलन करु असा इशारा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे दिला आहे तर मुख्याधिकारी या विषयी कोणती भूमिका घेतात यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या लेखी तक्रारीवर अर्जुन गोविंद घोलप गटनेते काँग्रेस,गजानन नामदेव वाघ गटनेते शिवसेना, यांच्या सह्या आहेत तसेच लेखी तक्रार देताना महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Comment