१२ वर्षाच्या युवतीने दिला बाळाला जन्म ,लैंगिक अत्याचार करणारा ही अल्पवयीन ,पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

 

विकी वानखेडे यावल

यावल; – तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे ज्या वयात मुले मुली खेळण्याचा आनंद घेतात , त्या वयात एका १२ वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला . एका एलवयीन मुलाने हे भीषण कृत्य केले आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि यावल तालुक्यात एका १२ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारातून बाळाला जन्म द्यावा लागला आहे . या घटनेमुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १२ वर्षीय मुलगी हि आपल्या आईवडिलांसह राहत होती .

या मुलीचे आईवडील आणि भाऊ हे दोघेही आपले जीवनाच गाडा चालविण्यासाठी हात मजुरीचे काम करीत असत . या मुलीने वर्षभराचे पासून शाळेत जाणे अचानक बंद केले , म्हणून ती घरीच राहत असे , घरी रहात असल्यामुळे त्यांच्याच समाजातील एका अल्पवयीन मुलाने तिला अमिष दाखवत तिच्यावर वर्षभर अत्याचार केला .

आणि या अत्याचारातून ती मुलगी गर्भवती राहिली . तो पर्यंत नातेवाईकांमध्ये गंधामुक्तीचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी त्या मुलीचे वागणे बोलण्यावरून काहीतरी फरक जाणविल्याने त्या ठिकाणी मुलगी गर्भवती असल्याचे माहीत पडले .

झालेल्या या घटनेमुळे यामुलीने १३ तारखेला शुक्रवारी दुपारी एका बाळाला जन्म दिला आहे . या घटनेमुळे सर्वांनाच धक्काचा बसला आहे . या सर्व झालेल्या प्रकरणा बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

Leave a Comment