पिळोदा बु॥ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंचानी खोटा ठराव करून गायरान जमीन दिली भाडयाने चौकशीची निळे निशान संघटनेची मागणी

0
912

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Iतालुक्यातील पिळोदा बु॥ ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची गायरान जमीन खोटा ठराव करून विक्री करण्यात आली असुन , या सर्व कारभाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निळे निशान सामाजीक संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . निळे निशान या सामाजीक संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना दिनांक १फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील पिळोदा बु॥ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणी सरपंच यांनी संगनमताने ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची गायरान जमीन गट क्रमांक व उपविभाग५६८हे बाहेरील सदस्यायांना भाडे कराराने दिली आहे . सदरचा हा प्रकार ग्रामसेवक आणी सरपंच यांनी गावकऱ्यांना अंधारात ठेवुन खोटा प्रोसेडींग बुक नंतर लिहुन खोटा ठराव करण्यात आल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे या प्रकारामुळे पिळोदा बु॥चे ग्रामस्थ हे अडचणीत आले आहे . याशिवाय ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्तीची कामे हे इतर ठीकाणी अत्यंत निकृष्ठ प्रति ची करण्यात येत असल्याची ही ग्रामस्थांची ओरड आहे .पिळोदा बु॥ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणी सरपंच यांच्या मनमानी कारभाराने गावातील ग्रामस्थांना शासनाच्या योजनापासुन वंचीत राहावे लागत आहे . ग्रामपंचायतीने गायरानची जमीन विक्री केल्याने गावातील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या काही जणांकडे बकऱ्या , गायी, म्हशी असे पाळीव जनावरे असुन ,या जनावरांना लागणारा चारा हा गायरान नसल्यामुळे गुराढोरांच्या चाऱ्यांची टंचाई झाली आहे . तरी ग्रामपंचायतीने केलेला गायरान जमीनी बाबत विक्री बाबतचा घेतलेला खोटा ठराव आणी ग्रामसेवक व सरपंच यांनी व ग्राम पंचायत विस्तार अधिकारी यांची संगनमताने केलेल्या कारभार करून आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांची तात्काळ ७ दिवसाच्या आत चौकशी करण्यात येवुन संबधीतांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे तसे न झाल्यास आपण आपल्या पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणास करणार आहे असा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here