प्रथम महिला शिक्षिका सावित्री बाई फुले जयंती कांग्रेस कार्यालयात उत्साहात साजरी

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : जिच्यामुळे शिकले दिन दुबळ्याची मुली आणि मुले ती ज्ञानदाती – ज्ञानज्योती होती सावित्रीबाई फुले”
ज्या काळात स्त्री शिक्षणाचे दार मुली साठी बंद होते.
चूला आणि मूल फक्त यातच महिलांचे संपूर्ण आयुष्य निघून जात होते.
मुलींना शिकविणे हे पाप समजल्या जात होते.
त्या कठीण काळात सावित्रीबाई फुले यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन अत्यंत संघर्षातुन लोकांचे दगड धोंडे शिव्या श्राप खाऊन आपल्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांच्यासह मुलींच्या शिक्षणाचे कवाडे उघडी केली.
आज काँग्रेस कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलां नेत्यांतर्फे सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस मालार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सौ. सरस्वतीताई पाटील व संगीताताई बोबडे यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला याप्रसंगी सौ. पदमा त्रिवेणी,कुसुम कांबळे, सोनी गोदारी,कामगार नेते सैय्यद अनवर,विजय माटला,इर्शाद कुरेशी,बालकिशन कुळसंगे,आरिफ शेख,सुनील पाटील,अंकुश सपाटे,विजय रेड्डी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment