पिंपरी चिंचवड आदिमुराई असोसिएशन ची पहिली सभा २ जानेवारी २०२२ रोजी जी. एस. के. इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी, चिखली. या ठिकाणी संपन्न झाली.

 

भारतीय पारंपरिक युध्दकला, शस्त्र कला आणि स्वसंरक्षण यावर आधारित हा खेळ आहे. पाश्चात्य संस्कृतीकडे भरकटत चाललेल्या तरून पिढीला भारत देशातील खेळांचे महत्त्व पटवून देण्याचा आणि या खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणे हा उद्देश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी पिंपरी चिंचवड मधील विविध भागातील मान्यवर प्रशिक्षक उपस्थित होते.
प्रामुख्याने जी. एस. के. स्कूल चे संस्थापक श्री. गणेश घोगरे, महाराष्ट्र आदिमुराई असोसिएशन चे अध्यक्ष श्री संजय बनसोडे, सचिव श्री किरन अडागळे, श्री रविराज चखाले, एल्बो बाँक्सिंग महाराष्ट्र असोसिएशन चे अध्यक्ष श्री. सुरेश कोळी, श्री. निलेश जाधव, श्री. शंकर साबळे, स्मिता धिवार मॅडम, निलम कांबळे मॅडम, सुदर्शन सुर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Comment