प्रधानमंत्री घरकुल योजनेत भ्रष्टाचार चौकशीची मागणी अपंग घरकुल लाभार्थी प्रदीप मुकपिडवार

 

हिंगणघाट :- मा.जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांना दिलेल्या निवेदनात घरकुल अपंग लाभार्थी प्रदीप कवडूजी मुकपिडवार राहणार डॉ मुजुमदार वार्ड हिंगणघाट यांनी सांगितले की, हिंगणघाट नगरपालिकेत प्रधानमंत्री अतिक्रमण घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे यादीची चौकशी करण्यात यावी व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा . मी दिनांक 2006 मध्ये घरकुल साठी अर्ज दिला होता तेव्हा पण माझा घरकुल मध्ये नंबर नाही आला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना 2016 मध्ये अर्ज केला त्याचा टोपण नंबर 455 आहे. मी 2021 मधील अतिक्रमण घरकुल यादी तपासणी केली तेव्हा पण माझा नंबर नाही आला. जे अतिक्रमण घरकुल यादी मध्ये नावे दाखवले आहे त्यांनी या अगोदर इतर घरकुल योजनेत लाभ घेतला आहे . तसेच काहीजनाचे पक्के घर असतानासुद्धा घरकुल मंजूर केले आहे. काही घरी नवरा-बायको तसेच आता मुलाच्या नावाने सुद्धा घरकुल योजनेत नाव आहे ही योजना गरिबासाठी आहे की पैसे देऊन घेणाऱ्या साठी अतिक्रमण योजनेची चौकशी करण्यात यावी व मला घरकुल देण्यात यावी अन्यथा मी आमरण उपोषण वर बसणार आहे अशी निवेदनातून माहिती दिली आहे. संबंधित माहिती मा.मुख्याधिकारी, मा.उपविभागीय अधिकारी हिंगणघाट ,मा आमदार समीर कुणावार, मा. माजीआमदार राजू तिमांडे, माजी आमदार अशोक शिंदे, पालकमंत्री सुनील केदार यांना दिली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Leave a Comment