बोदवड येथेल तहसिलदारांची नियुक्ती करणे साठी सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ प्रमोद धामोडे यांचे आंदोलन.

0
261

 

जिल्हा प्रतिनिधी सतिष बावस्कर

बोदवड येथे तहसीलदारपद रिक्त असून त्या मुळे नागरिकांना त्रास होत आहे वारंवार मागणी होऊनही तहसीलदार नियुक्ती न झाल्याच्या निषेधार्थ येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी आज 12 वाजे पासून सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ केला.


त्या आधी त्यांनी निवेदन देऊन मागणी केली होती की ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसिल कार्यालयामध्ये काम असते सदरचे काम करीत असतांना सदर ठिकाणी पुर्णवेळ तहसिलदार नसल्यामुळे वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना तसेच पुरवठा शाखेमध्ये विविध कामांसाठी, पंतप्रधान सन्मान योजने संदर्भात तक्रार करणेसाठी सक्षम असे तहसिलदार नसल्यामुळे बोदवड तालुक्यांतील नागरीकांचे नुकसान होत आहे. याबाबत बऱ्याच वेळा विविध पक्षामार्फत तसेच संघटनांमार्फत निवेदने देण्यात आलेली आहेत असे प्रसार माध्यमांव्दारे समजते. परंतु त्याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेवून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.म्हणून आपण
१९/०९/२०२२ पासून वेळ 12 वाजता बोदवड तहसिल कार्यालय या ठिकाणी पूर्णवेळ तहसिलदार यांची नियुक्ती होत नाही तो पर्यंत सरणावर झोपून तहसिल कार्यालय बोदवड या ठिकाणी आमरण उपोषणास प्रारंभ करणार आहोत मात्र त्या वर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हे उपोषण आज पासून धामोडे यांनी आरंभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here