शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा उपप्रमुखपदी गोपाळ चौधरी यांची निवड

0
584

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नुतन पदाधिकारी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने I नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असुन , तालुक्यातील चिंचोली येथील गोपाळ चौधरी यांची जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे . संपुर्ण राज्यात राजकीय गडामोडींना वेग आला असुन शिवसेना पक्षा अंतर्गत फेरबदल करण्यात आले असुन, विरावली तालुका यावल येथील तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने अखेर त्यांनी शिवसेनेच्या पक्षा अंतर्गत कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त करीत आपल्या शिवसेना जिल्हा उपप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता . मात्र त्यांच्या राजीनाम्या मागे ते शिवसेनेचे की शिंदे गटाचे अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात विविध ठीकाणी रंगु लागल्या असतांना शिवसेनाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडुन अधिकृतरित्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याने असुन, शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी चिंचोली तालुका यावल येथील गोपाळ चौधरी यांची निवड करण्यात आली असुन , तालुक्यात कोण कोणत्या गटाला या संपुर्ण चर्चला आता पुर्णविराम मिळाला आहे .गोपाळ चौधरी यांच्या निवडीचे यावल परिसर व चोपडा मतदारसंघात शिवसेनिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here