संग्रामपुर तालुक्यातील विविध मंदिरासमोर आंनद उत्सोव साजरा करण्यात आला. पातुडाॅ बु येथील बालाजी मंदिरात महाआरती, घंटानाद, महाप्रसाद चे आयोजन

 

कोरोना महामारी च्या संकटाला तोंड देत असताना सर्व सामान्य जनता मागील काही दिवसांपासून राज्यात दारु दुकाने, एस टी, माॅल, थेटर, हाॅटेल्स, रेस्टॉरंट, आठवडी बाजार सुरु झालेले असतांना ठाकरे सरकार मात्र मंदिर उघडण्याच्या विरोधात दिसत असल्याने दुखी होती. भारतीय जनता पक्ष व हिंदूत्ववादी संघटना या विरोधात आंदोलन करीत होते कित्येक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र पक्ष नेते, कार्यकर्ते यांनी शासनावर दबाव कायम ठेवला त्याचीच परिणती शासनाला या सर्वांच्या समोर झुकावे लागले उशिरा का होईना मंदिरासह सर्वच धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. आज संग्रामपुर तालुक्यातील विविध मंदिरासमोर आंनद उत्सोव साजरा करण्यात आला. पातुडाॅ बु येथील बालाजी मंदिरात महाआरती, घंटानाद, महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका अध्यक्ष श्री. लोकेश राठी सह, रमणभाऊ सेवक, कृष्णराव रहाटे, अविनाश धर्माळ, रामदास म्हसाळ, बाळुभाऊ वानखडे,भगवानदास राठी, दिपकभाऊ गोमासे, सुभाषभाऊ बोपले, विनायक चोपडे, राजुभाऊ मांडवगडे, कपिल गवई, ऊकडॉ कुरवाळे, शामभाऊ वानखडे, सौ. रत्नप्रभाताई नि धर्माळ पं स सदस्या, सौ. अश्विनीताई भुतडा, सौ. मीनाताई सेवक, सौ. मनिषा म्हसाळ, सौ. ईशा राठी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

Leave a Comment