70/30 चा फार्मूला रद्द करा: आमदार.संतोषराव बांगर

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय प्रवेश 70/30 टक्क्याचे विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून साध्य करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशाच्या जागा कमी असल्याने अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत. देशपातळीवर एकच परीक्षा घेतली जाते व देशातील इतर कुठल्याही राज्यात 70/30 हे धोरण राबविले जात नाही. तरी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्याकरिता आज शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवा सेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांच्याकडे 70/30 चे विभागवार धोरण शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली श्री.संतोषराव बांगर यांच्यासोबत परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर हे उपस्थित होते. यावेळी युवा सेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांनी आपला प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन दिले.

Leave a Comment