Home बुलढाणा अज्ञात इसमाने पेटवून दिले एमआरजीएस अंतर्गत असलेले वृक्ष लागवड क्षेत्र

अज्ञात इसमाने पेटवून दिले एमआरजीएस अंतर्गत असलेले वृक्ष लागवड क्षेत्र

 

गजानन सोनटक्के जळगाव

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येथील जुनापाणी परिसरामध्ये एमआरजीएस अंतर्गत वृक्षलागवड केली होती परंतु एक एप्रिल 2019 रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने वृक्ष लागवड क्षेत्र पेटवून दिले अशी तक्रार ग्रामपंचायत प्रशासनाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला केली आहे सविस्तर असे की जुनापाणी परिसरात विविध वृक्षांची लागवड केली होती व वृक्ष संगोपनाची कार्य चांगले चालू होते परंतु एक एप्रिल 2021 रोजी वृक्षलागवड झालेले पेटवून देण्यात आले त्यामुळे त्यामुळे परिसरातील गवत व छोटे-मोठे वृक्ष या आगीमध्ये होरपळून निघालेले आहेत परिणामी जुनापाणी परिसरातील पर्यावरणाची हानी झालेली आहे