भाजपा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याचे दहन

0
394

 

प्रतिनिधी
अजहर शाह

भाजपा आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी
मा.आमदार विजयराज शिंदे

बुलडाणा:-
ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक झालेल्या १२ भाजपा आमदारांचा आवाज दाबत त्यांना सूडबुद्धीने निलंबित केल्याच्या निषेधार्थ बुलडाणा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपा नेते मा. आमदार विजयराज शिंदे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात आज दि.6.7.2021 रोजी भाजपाच्या वतीने बुलडाणा शहरातील स्व.वसंतरावजी नाईक चौकात महाविकास आघाडी सरकारचा रावण रुपी प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.

भाजपा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया पुढे जोरदार निदर्शन करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. “महाविकास आघाडी सरकारचा करायचं काय खाली मुंडक वर पाय,”
“बारा आमदारांचे निलंबन करणाऱ्या आघाडी सरकारचा धिक्कार असो,”
“भारतीय जनता पक्षाचा विजय असो” अश्या अनेक विध घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणानून गेला होता.

यावेळी राज्याचे राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करून निलंबित केलेल्या 12 भाजपा आमदारांचे निलंबन तात्काळ रद्द करून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारा मुळे एम.पी.एस.सी परीक्षा पास होऊन आत्महत्येचा बळी ठरलेल्या स्व.स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना केली आहे.

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सभागृहात बाजू मांडणाऱ्या भाजपा पक्षातील आमदारांचे निलंबन करून आघाडी सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे.
हा निलंबनाचा आदेश म्हणजे विरोधी पक्षाची मुस्कटदाबी असून लोकशाहीची गळचेपी आहे.
“भाजपा या धोरणाचा तिव्र निषेध करीत असून महाविकास आघाडी सरकार त्वरित बरखास्त करावे व भाजपच्या सदर 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल” असा आक्रमक इशारा भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांनी भाजप च्या वतीने आघाडी सरकारला दिला आहे.

यावेळी आंदोलनात किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक वारे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम लाखोटीया,जिल्हा उपाध्यक्ष सौ.विजयाताई राठी,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, मा.नगराध्यक्ष विठठलराव येवले,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,गजानन देशमुख, महिला मोर्च्या जिल्हा सरचिटणीस अल्काताई पाठक,महिला मोर्च्या तालुकाध्यक्ष सौ.मायाताई पदमने,डॉ.राजेश्वर उबरहंडे,विनायक भाग्यवंत, कुलदीप पवार ,बाळू ठाकरे,हरिभाऊ सीनकर, गणेश देहाडराय,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सुभाष जगताप,युवा मोर्चा जिल्हा संघटक मयूर बघे,भुजंगराव सावळे, सुमंता चव्हाण, अनंता शिंदे,यश तायडे, गोपाल तायडे,नितीन हिवाळे, यतीन पाठक, संजय अग्रवाल, किरण नाईक, सोनू बाहेकर,शनिराज सौदे,नितीन बेंडवाल,ईश्वरसिंग चंदेल,विठ्ठल नरोटे,अण्णा पवार,भारत गव्हाणे, प्रदीप तोटे,समाधान मोहिते,संजय जुंबड,प्रदीप सोनटक्के,राहुल वायकोस,पवन बगाडे, भिकाजी पदमने,आशिष व्यवहारे,युवा मोर्चा शहाराध्यक्ष सोहम झालटे, हर्षल जोशी,गणेश पांडे,मोहित भंडारी,किशोर गवळी,विनोद आडवे,शेख रशीद,विलास पालकर,विजय मोटे यांसह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here