Home बुलढाणा PWDnews/एकलारा–बावनबीर मार्गावरील सुकलेल्या वृक्षांची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी

PWDnews/एकलारा–बावनबीर मार्गावरील सुकलेल्या वृक्षांची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी

0
2

 

एकलारा–बावनबीर मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या वृक्षारोपण योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक पिच्छडा वर्ग संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख कदीर भाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव येथील अधिकारी एकनाथ तळेल यांच्याकडे सविस्तर तक्रार निवेदन सादर केले.


(वरवट बकाल परिसरातील सुकलेल्या वृक्षांचे छायाचित्र)

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे तसेच योग्य देखभाल व संरक्षणाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष सुकून नष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असून पर्यावरणीय हानीदेखील झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेख कदीर भाई यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच वृक्षारोपणासाठी खर्च झालेल्या निधीचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, सुकलेल्या वृक्षांची तात्काळ पुनर्लागवड करावी आणि दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. Fda farmernews

 

याशिवाय करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात संघटनेला देण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.

Warvatnews /तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, लोकायुक्त, पर्यावरण विभाग आणि न्यायालयीन स्तरावर दाद मागितली जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here