यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत ‘ओझोन दिन’ निमित्त ‘झोन वाचवा -निसर्ग वाचवा’, या विषयावर प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकुण १८ विद्यार्थी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.

यात प्रथम क्रमांक – तबस्सुम रज्जाक तडवी (तृतीय वर्ष कला), द्वितीय -दुर्गा अशोक वाघ (तृतीय वर्ष विज्ञान), तर तृतीय हेमांशू महेंद्र नेवे (तृतीय वर्ष वाणिज्य) क्रमांक मिळवून स्पर्धेत यश मिळवले.

तसेच उत्तेजनार्थ म्हणून तडवी अंजुम छबु (द्वितीय वर्ष कला) व रविंद्र वसंत कोळी(द्वितीय वर्ष कला) यांची निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए पी पाटील, डॉ. सौ. सुधा खराटे, डॉ. एच जी भंगाळे, प्रा. एस. आर. गायकवाड, मिलिंद बोरघडे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. एस. पी. कापडे व प्रा. डॉ. पी.व्ही.पावरा यांनी काम पाहिले. या निबंध स्पर्धेचे आयोजन रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. डी. पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी श्री प्रमोद कदम, अनिल पाटील, संतोष ठाकूर यांनी परिश्रम घेतले.







