शेगाव तालुका प्रतिनिधी अर्जुन कराळे
आगामी काळामध्ये शहरात व ग्रामीण भागामध्ये साजरे होणारे सण आणि उत्सव नियमांचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरे करावे असे आवाहन खामगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी शनिवार दिनांक २ ऑक्टोंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात केले आहे शेगाव पोलीस स्टेशन परिसरात शेगाव शहर आणि ग्रामीण पोलीस विभागाकडून शांतता समितीची बैठक शनिवार दिनांक २ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती आगामी काळात नवरात्र उत्सव, शारदा उत्सव, धम्मचक्र परिवर्तन दिन, दसरा उत्सव आणि विविध धार्मिक सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहेत नवरात्र उत्सव आणि सण उत्सव दरम्यान शासनाने घालून दिलेल्या नियमांतर्गत कोणत्याही प्रकारे कोणत्याही मंडळातर्फे गरबा उत्सव साजरा होणार नाही याच प्रमाणे अत्यंत साध्या पद्धतीने देवी मुर्ती स्थापना करावी दसरा उत्सव प्रतीकात्मकरीत्या चार ते पाच नागरिकांची उपस्थिती मध्ये नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा या प्रमाणे धम्मचक्र परिवर्तन दिन सुद्धा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मध्ये साजरा करावा मुस्लिम समाज बांधवांना याच पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मध्ये साजरे करावेत असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी केले यावेळी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर शेगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, शहर व ग्रामीण सर्व नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष, नगर परिषद सदस्य, व प्रतिष्ठित नागरिक जाती-धर्माचे नागरिक उपस्थित होते.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


