काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी चा मागणीला यश
(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : शहरात गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याचे प्रकार वाढीस लागले होते.
हा परिसर कोळसा खाणीचा असल्याने व उन्हाळा शुरू झाल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी अग्निशमन वाहनांची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला असता 86.56
लक्ष रुपये किमतीचे अग्निशमन वाहन नगरपरिषदेला प्राप्त झाले.
सदर अग्निशमन वाहनाचे लोकार्पण 29 मार्च रोजी नगरपरिषदेच्या प्रागणात पालकमंत्री विजय वड्डेटीवार
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरपरिषद प्रशासक निलेश गौड, नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही, तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे,काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,शामराव बोबडे,अलीम शेख,इर्शाद कुरेशी, व सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.