अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
चामोर्शी:-चामोर्शी केंद्राअंतर्गत आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी केंद्राचे केंद्रप्रमुख हिम्मतराव आभारे,गट साधन केंद्र चामोर्शी येथील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते व केंद्र शाळा चामोर्शी येथील शिक्षक प्रविण पोटवार यांनी आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान स्थलांतरित कुटुंबातील पाच मुलांचा शोध घेऊन त्यांना केंद्र शाळा चामोर्शी येथे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेतले.सदर कुटुंब हे लाखांदूर तालुक्यातील असून ते उदरनिर्वाह करण्यासाठी चामोर्शी येथे आलेले आहेत.त्यांच्या सोबत त्यांची मुलेही असून ती शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून आले.त्यामुळे केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते व प्रविण पोटवार यांनी शोध मोहीम राबवून सदर वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील केले.त्यामध्ये
अमर शशिकपूर शिवसकर वय 10 वर्ष याला इयत्ता चौथी मध्ये,आशिष शशिकपूर शिवसकर वय 7 वर्ष याला इयत्ता दुसरी मध्ये,पिंकी शेखर शिवसकर वय 6 वर्ष हिला इयत्ता पहिली मध्ये,शीतल शशीकपूर शिवसकर वय 13 वर्ष हिला इयत्ता सातवी मध्ये तर अर्जुन राजहंस सुतार वय
14 वर्ष याला इयत्ता आठवी मध्ये प्रवेशीत करण्यात आले.








