Home Breaking News मलकापूर रोडवरील कमानीचा भाग कोसळून 5 मजूर जखमी;एक गंभीर अकोल्यात भरती (...

मलकापूर रोडवरील कमानीचा भाग कोसळून 5 मजूर जखमी;एक गंभीर अकोल्यात भरती ( crimenews )

 

इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव /बुलढाणा

crimenews :बुलढाणा : मलकापूर रोडवर माऊली हॉटेल नजीक असलेल्या कमानीचा भाग कोसळून 5 मजूर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी संध्याकाळी घडली.

यातील एक मजूर शांताराम जनार्दन गवई राहणार वार्ड क्रमांक 2, हा गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सदर कमानीला सिंहगड प्रवेशद्वार असे नाव देण्यात आलेले आहे. कमान पूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

आज सायंकाळच्या सुमारास कमानीच्या एका भागाचा स्लॅब भरणे सुरु असतांना उंचावरून मलबा खाली पडला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यात 5 मजूर जखमी झाले असल्याची माहिती बुलढाणा ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली.

crimenews: गणेश गुंजकर (रा. सव तालुका बुलढाणा), गजानन प्रल्हाद पिंपळे (रा. भिलवाडा बुलढाणा), गणेश रामदास गवई आणि अविनाश रामदास काळे (दोघे रा. मिलिंदनगर बुलढाणा) या चौघांवर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे