संकल्पक वन बुलढाणा मिशन संदीप शेळके यांच्या हस्ते जिल्हा कृषी अधीक्षक यांना,बियाणे उपलब्ध करून देणे व खतांची दरवाड कमी न झाल्यास जिल्हा भरात तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदन द्वारे देण्यात आला (krushinews )

0
3

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

krushinews:दिनांक 6/5/2024 रोजी संकल्पक वन बुलढाणा मिशन माननीय संदीप शेळके यांच्या हस्ते मा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले,आगामी खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक खते व बियाणे उपलब्ध झाली पाहिजेत.

तसेच खतांची दरवाढ रोखणे गरजेचे आहे. तरच जगाचा पोशिंदा जगेल. वन बुलढाणा मिशन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. खतांची दरवाढ झाली तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याबाबत ६ मे रोजी जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांना एकाच वेळी निवेदन देण्यात आले.

गतवर्षी नफेखोर व्यापाऱ्यांनी बोगस बियाणे वापरून अनेक शेतकऱ्यांची लुट केली होती. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ आमच्या शेतकरी बांधवांवर आली होती. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

तसेच रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ करु नये. गतवर्षीच्या किंमतीतच शेतकऱ्यांना खते उपलब्ध करावीत, अशी मागणी करण्यात आली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

krushinews:जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देतांना दत्तात्रय एकनाथ सावळे , कैलास भीमराव इंगळे,ज्ञानेश्वर विनायकराव पाटील दिलीपराव साहेबराव पाटील, गणेश शेणफड काटे , दत्तात्रय नारायण जाधव , रामसिंग इंद्रसिंग राजपूत उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here