मूर्तिजापूरात भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन..( murtijapurnews )

0
1

 

murtijapurnews:मूर्तिजापूर :- येथील सार्वजनिक भगवान परशुराम जन्मोत्सव समिती व सर्वभाषीय ब्राह्मण सभा मुर्तीजापुर च्या वतीने शहरात श्री भगवान परशुराम जन्मोत्सव व भगवान बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले आहे.

अक्षय तृतीया शुक्रवार १० मे रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव व भगवान बसवेश्वर जयंती निमित्य येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर, टांगा चौक, मोरारजी चौक, भगतसिंग चौक मार्गे श्री छत्रपती शिवाजी

महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन समोरून चिखली गेट रोड, मरी माता मंदिर मार्गे स्टेशन विभाग स्थित असलेल्या श्री प्रभू राम मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता भव्य मोटार सायकल शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

या शोभायात्रेत ढोलताशा पथक वादन , डीजे, लेझीम आदींचा सहभाग राहणार असून श्री भगवान परशुराम व भगवान बसवेश्वर यांचे देखनीय चित्ररथ राहणार असून.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

murtijapurnews:या मोटर सायकल शोभा यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी राहण्याचे आवाहन सार्वजनिक श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती व सर्वभाषीय ब्राह्मण सभा मुर्तीजापुर चे मीडिया संपर्क प्रमुख नयन पांडे व अनिरुद्ध गणोरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here