समाजाच्या दफन भूमी मधील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सुलतानपूर येथे आमरण उपोषण(Lonarnews )

0
7

 

प्रतिनिधि सय्यद जहीर

अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला…..

 

Lonarnews:दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर येथील नाथबाबा(गार पगारी) समाजाच्या दफनभूमीमध्ये अज्ञात लोकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे. पुतळ्याला पर्यायी जागा देऊन अतिक्रमण हटविण्यासाठी नाथ बाबा (गारपगारी) समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या वेळेला सुलतानपूर या ठिकाणी लोणार रोडला लागून असलेल्या नाथबाबा ( गारपगारी) समाजाच्या दफनभूमी मध्ये अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून अतिक्रमण केले आहे.

या विषयाची चाहूल नाथ बाबा (गारपगारी )समाजाचे व्यक्ती आणि अनिल ठाकरे यांना आल्यामुळे त्यांनी ३ जानेवारी २०२५ लोणार तहसिलदार यांना या विषयी निवेदन सादर केले होते. तसेच संबंधित पोलीस प्रशासन व महसुल विभाग वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन हे अनधिकृत अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात अनिल ठाकरे यांनी विनंती केलेली आहे. परंतु संबंधित अधिकारी यांनी निष्काळजी व हलगर्जीपणा केल्यामुळे या समाजाला नाईलाजास्तव दिनांक २० जानेवारीपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

४ जानेवारी २०२५ ला ही बाब उघडकीस येताच सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री गजानन कावरके यांनी मेहकर पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात माहिती दिली. या ठिकाणी नाथबाबा (गारपगारी) समाजाची पूर्वापारपासून दफन भूमी (स्मशानभूमी) असल्याबद्दलचे रेकॉर्ड महसूल विभागात उपलब्ध आहे. या विषयीचा असलेल्या सातबारावर ४०×७०ची नोंद आहे. परंतु गावात आणि समाजात कलह निर्माण होऊ नये म्हणून लोणार नायब तहसीलदार ईप्पर साहेब, मंडळ अधिकारी, तलाठी संतोष पनाड, हेडकॉन्स्टेबल केदार साहेब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गजानन कावरके, हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव, तसेच गावकरी संगपाल नागवंशी पनाड, शिवप्रसाद जोगदंड यांनी उपोषण करत्या सोबत चर्चा करून तडजोड करण्याचा प्रयत्न केला.

Lonarnews:परंतु अनिल ठाकरे उपोषण करते यांनी त्यांच्या निर्णयाला मान्य न करता आमची दफनभूमी (स्मशानभूमी) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळयाचे अतिक्रमण काढून आम्हाला जागा मोकळी करून वालकंपाऊंड करून देण्यात यावे असा निर्णय घेतल्यामुळे सर्वच हतबल होऊन परत गेले. दिनांक १६/०१/२०२५ रोजी सुलतानपूर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांना लोणार तहसिलदार यांनी कोणतीही व्यक्ती ,संघटना, संस्था, शासकीय व निमशासकीय संस्थेच्या तसेच खाजगी मालकीच्या जागेवर मा. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा बसविता येत नसताना सुद्धा सुलतानपूर येथे हा प्रकार घडत आहे आपण पुतळा धोरण व दिनांक ३ मे २०१७ चे शासन निर्णयानुसार कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे तरी सदर प्रकरणी कार्यवाही करून कार्यालयास कळवावे अशी सूचना दिली होती.आता प्रशासन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हविटणार की, वाटाघाटी करण्याची तडजोड करणार, कोणता निर्णय घेणार याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. गावकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चेला उधान आलेले आहे एवढे मात्र खरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here