पळसखेड भट येथील दोन युवकांचा अपघातात मृत्यू(Buldhananews)

0
4

 

 

जावेद शहा  बुलडाणा

Buldhananews :बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील विठ्ठल पांडूरंग चिंचोले ( सेवानिवृत्त

कोतवाल ) यांचा मोठा मुलगा , स्व .धर्मराज विठ्ठल चिंचोले वय ३२ वर्ष ,, व सुधाकर सिताराम मोहिते यांचा मुलगा स्व. शंकर सुधाकर मोहिते वय २५ वर्ष हे संभाजीनगर येथून दि. १४/३/२०२५ रोजी संध्याकाळी भोकरदन मार्गे पळसखेड भट येथे आपल्या गावी येत असताना भोकरदन मार्गावर हिरेगाव जवळ दोघांचा अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने अपघात झाला

होळीनिमित्त गेट-टुगेदरचा परतीचा प्रवास अपघातात संपला(accdentnews)

Buldhananews :त्यांना उपचारासाठी संभाजी नगर येथे घाटी रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून पळसखेड येथे दि. १५ / ३ / २०२५ रोज शनिवार ला दुपारी २ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .या घटनेने पळसखेड भटसह पंचक्रोशीत हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here