प्रतिनिधी सचिन वाघे
Brekingnews:हिंगणघाट,दि.९ मे.शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने मॅफेड्रान या अंमली पदार्थांची विक्री करतांना दोन आरोपींना ६.५५ ग्राम एमडीसह ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार काल ८ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात रात्री गस्तीवर होते.
RevenueNews / वेळा शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर उपविभागीयअधिकारी पथकाची कारवाई:
या दरम्यान त्यांना शहरात एमडी या अंमली पदार्थाची अवैध वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील मोठा मारोती देवस्थानाजवळ नाकेबंदी करून दुचाकीवर जाम येथून सर्विस रोडने येताना दोन इसम आढळले.
सदर इसमांस ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्याची ओळख निखिल अशोक भोकरे(२०) व त्याचा मागे बसलेला मित्र आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे(३४)दोन्ही रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट अशी सांगीतली.
त्या दोघांची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये मोटरसायकल चालक निखिल अशोक भोकरे याच्या पॅन्टच्या खिशात एका प्लॅस्टीकच्या कॅरीबॅग मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ मिळाला.
या अंमली पदार्थांचे वजन वजन ६.५५ ग्रॅम किंमत १८,३९० रुपये व हिरो कंपनीची विना क्रमांकाची स्प्लेंडर प्लस किंमत ९० हजार रूपये असा एकुण १, लाख ८ हजार ३९० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायदयान्वये दोन्ही आरोपीतांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
Brekingnews:ही संपूर्ण कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, आशिष नेवारे,मंगेश वाघमारे, सायबर शाखा वर्धा येथील अनुप कावळे, गोविंद मुंडे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.