सचिन वाघे हिंगणघाट
हिंगणघाट, दि. 26 ऑगस्ट 2025 (मंगळवार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने नगरपरिषद वाचनालय टाकाग्राउंड, हिंगणघाट येथे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 17 वर्षांखालील मुलींच्या गटातील पल्लवी मुडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.
Hingnghatnews /ज्ञानदा हाय स्कूल ची जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेकरिता 3 खेळाडूची निवड
तसेच 17 वर्षखालील गटात मुलांमध्ये लोकेश येमुलवार याने सुद्धा प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत विजय मिळवीला व कुस्तीचे मैदान गाजविले. या दोन्ही खेळाडूंनी वर्धा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
शिक्षणाबरोबरच क्रीडेला समान महत्त्व देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे संस्थापक श्री. गिरधर बाबूजी राठी सतत प्रोत्साहन देतात. क्रीडा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सक्षम होऊन अशा स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत, ही विशेष बाब आहे.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. गिरधर राठी (संस्थापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट व वाघोली), सौ. अर्पना राठी (अध्यक्षा), श्री. रशेष राठी (सचिव), श्री. प्रवीण धोबे (कोषाध्यक्ष), श्री. अभिनव जैस्वाल (मुख्याध्यापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), श्री. रोहन हुमाड (क्रीडा शिक्षक) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







