Ajitpawar/घरपट्टेसाठी सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांचे उपमुख्यमंत्र्याकडे साकडे

0
40

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- नगरपरिषद अंतर्गत यशवंत नगर(मास्टर कॉलनी),रामनगर वॉर्ड येथील नागरिकांनी अनेक वर्षापासून सुरू असलेला कायमस्वरूपी घरपट्टे संबंधित संघर्ष आता सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवीला आहे.

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या नागरिकांना अद्याप कायमस्वरूपी घरपट्टे मिळालेले नाहीत.
वारंवार अर्ज,कागदपत्र विविध स्तरावर निवेदने दिली मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडे मागणी करून अजूनही स्थायी पट्टे देण्यात आलेली नाही व कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

Hingnghatnews/संत तुकडोजी वॉर्डातील समस्या निकाली काढा.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंगणघाटला आले असता हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांच्या उपस्थितीत घरपट्टेच्या संघर्ष व सद्यस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली,त्यांचा संघर्ष ऐकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे

Ajitpawar/उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला निर्देश देऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून घरपट्टे बाबत प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले व यशवंत नगर(मास्टर कॉलनी),राम नगर वॉर्ड येथील रहिवाशांचा ४० ते ५० वर्षांचा घरपट्टे साठी संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर निवेदनातून मांडण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here