प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट | २३ सप्टेंबर २०२५ (मंगळवार) – सकाळी ११:३० वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हिंगणघाट येथील मध्यवर्ती कार्यालयात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली.Sivshenanews
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उद्योग राज्यमंत्री मा. अशोक शिंदे होते. त्यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख राजेंद्र (राजू) खूपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे व तालुकाप्रमुख मनीष देवडे हेही प्रमुख उपस्थित होते.
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्ष संघटन मजबूत करणे आणि गावपातळीवर शाखा निर्माण करण्यासंबंधी ही बैठक घेण्यात आली.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रकाश अनासाने यांनी केले, तर प्रस्तावना उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांनी मांडली. ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंगजी मोहोड यांनी अशोक शिंदे यांच्या दीर्घकालीन योगदानाची आठवण करून दिली व उपस्थित शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
यावेळी व्यासपीठावर लक्ष्मण डंभारे, उपतालुकाप्रमुख गोपाल मेघरे, सुधाकर डंभारे, सुधाकर इंगोले, महेंद्र महाजन, शंकर झाडे, नंदू रेडलावार, सुनील आष्टीकर, मारोती हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुकाप्रमुख मनीष देवडे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत संघटनेच्या पुढील वाटचालीसंदर्भात आपले विचार मांडले. जिल्हाप्रमुख राजू खूपसरे यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत संघटनात्मक ताकद वाढवण्याचे महत्व अधोरेखित केले.
बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात मा. अशोक शिंदे यांनी १९८७ पासून आजपर्यंतचा पक्षाचा प्रवास उलगडून दाखवत शिवसैनिकांना पक्षासाठी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा दिली. भाजपासारख्या धनशक्तीवर अवलंबून असलेल्या पक्षांच्या विरोधात ठामपणे उभे राहून शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Sivshenanews/या बैठकीस विनोद मोहोड, शीतल चौधरी, रामचंद्र शिंदे, सूर्यकांत ढुमणे, सुधाकर अगडे, रामराव रहाटे, विजय कोरडे, नथूजी कुकडे, हेमराज हरणे, केशव तळवेकर, नितीन कोल्हे, अशोक भोसले, अमोल वादाफळे, मोहन पडवे, क्षितिज राजू पडवे, चंदन काकडे, विनोद चाफले, सतीश लोणारे, प्रशांत सुपारे, मारुती भोयर, जितेंद्र साळवे, गजानन धोटे, अजय महाजन, करण जनेकार, दिलीप कुकडे, रामदास फरकाडे, सतीश कुकडे, निलेश मानकर, योगेश ठक, नथू कापसे, गजानन ठाकरे, विलास चौधरी, अशोक सुरकार, शंकर जोगे, दिलीप घुसे, कृष्णाजी लोणारे, शुक्राचार्य वनकर, आशिष वाघ, संजय रहाटे, शकील अहमद, हिरामण आवारी, अनंता गलांडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.