Devendrafadnsvis/फडणवीसांच्या ‘पॅकेज’ची होळी; शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन वर्ध्यात १६ ऑक्टोबरला!

0
1

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा:राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी नुकतेच जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे पॅकेज हे आकड्यांची हेराफेरी असून, शेतकऱ्यांच्या मूळ मागण्यांपासून दूर असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या शासन निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पॅकेज होळी आंदोलन’ करण्यात येणार आहे.

शेतकरी संघटनेच्या नेत्या माजी आमदार सरोज काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी शैला देशपांडे, जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर व युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी या आंदोलनाचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मागील वर्षीपेक्षा यंदा कोरडवाहू व बागायती पिकांच्या मदतीत मोठी कपात झाली आहे. मागील वर्षी कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ₹१३,६०० मिळाले असताना, यावर्षी फक्त ₹८,५०० जाहीर करण्यात आले आहेत. बागायतीसाठीची रक्कम ₹३६,००० वरून ₹३२,५०० करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी सरकारवर आयात-निर्यात धोरण, वायदेबाजारांवरील बंदी, आणि बाजारभाव घसरवण्याचे आरोप करत सांगितले की, हीच “शेतकऱ्यांकडून लूट” झालेली रक्कम परत द्यावी. या मागणीसाठी हेक्टरी ५०,००० रूपयांची मदत तातडीने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Devendrafadnsvis/शेतकरी संघटनेने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पक्षीय भेद विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.

फडणवीसांच्या ‘पॅकेज’ची होळी; शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन वर्ध्यात १६ ऑक्टोबरला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here