यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील नगर पालीकेच्या उप नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीतील काँग्रेस गटाच्या सईदाबी शेख याकुब यांची तर स्विकृत सदस्यपदी महाविकास आघाडीचे अतुल वसंत पाटील व भारतीय जनता पक्षाच्या गटातुन उमाकात रेवा फेगडे यांची निवड करण्यात आली आहे. आज दिनांक १५ जानेवारी रोजी यावल नगरपालीकेच्या सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या नगरपालीकेच्या पहील्या सर्वसाधारण सभेत सर्व २३ नगरसेवक उपस्थित होते . यावेळी सभेत उप नगराध्यक्षपदा च्या निवडी करीता राष्ट्रवादी ( अ प ) गटाचे अंजुम बी कदीर खान यांना ४ मते मिळालीत तर भारतीय जनता पक्षाच्या उप नगराध्यक्षपदासाठी रूबाब महमंद तडवी यांना ८ मते मिळालीत तर महाविकास आघाडी काँग्रेसच्या सईदाबी शेख मोहम्मद याकुब यांना १२ मते मिळाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
या सर्वसाधारण सभेचे कामकाज मुख्यधिकारी निशीकांत गवई व सहमुख्यधिकारी रविकांत डांगे यांनी निवडणुक प्रक्रीयेचे काम पाहीले .
Yavalnews /आपल्या आपल्या नगरसेवकांची निवड झाल्यावर सभागृहाच्या बाहेर पदाधिकारी घोषणाबाजीने एकच जल्लोष केला .








