संग्रामपूर (रामेश्वर गायकी)ः- लोकशाही केवळ शासन पद्धती नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित जीवन पद्धती आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्य असून तरुण युवक पिढीने निर्भय व प्रामाणिकपणे आणि सद्विवेक बुद्धीने मतदान करून लोकशाही सशक्त करावी. लोकशाहीचे महत्त्व विषद करतांना वरवट (बकाल )येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.श्रीराम येरणकर यांनी सांगितले.
लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी मतदार जागृती अत्यंत आवश्यक असून विशेषतः युवक, युवतीमध्ये मतदानाबाबत जाणीव निर्माण व्हावी. ह्या उद्देशाने तालुक्यातील वरवट( बकाल) येथील कला व वाणिज्य महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाचे वतीने आज दि.२५ / जानेवारी रोजी मतदार जागृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.श्रीराम एरणकर होते. तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डाॕ.राजेंद्र कोरडे तसेच गुणवत्ता हमी कक्ष(आयक्युएस) समन्वयक डॉ.संजय टाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ह्यावेळी डाॕ. राजेंद्र कोरडे यांनी मतदान प्रक्रियेचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करतांना सांगितले की मतदानाच्या माध्यमातून सामान्य नागरिक आपले मत, विचार व अपेक्षा शासनापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मतदानाकडे दुर्लक्ष न करता जबाबदारीने मतदान करणे गरजेचे आहे.
तर डाॕ.संजय टाले यांनी संविधानाने मूल्य लोकशाही आणि मतदारांची भूमिका यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. शिक्षण संस्था ह्या मतदार जागृतीचे प्रभावी माध्यम असून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सहभाग नोंदविला व मतदार नोंदणी मतदार प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार जागृती दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाल्याचे यावेळी स्पष्ट दिसून आले.
Warvatnews /कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एनएस चे समन्वयक प्रा.नागेश इंगळे यांनी केले. यावेळी त्यांनी लोकशाही मूल्य जपण्यासाठी महाविद्यालय सातत्याने व सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.








