यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
बोराळे, दि. २६ जानेवारी :येथील बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.३० वाजता ग्रामपंचायत सदस्य सौ. गौतमबाई भीमराव वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रध्वजास वंदन केले.
या प्रसंगी
विद्यार्थ्यांनी अत्यंत भावपूर्ण रीतीने राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला.
भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूल्ये, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडले. वक्त्यांनी आपल्या भारतीय संविधान हे देशाच्या एकतेचे व लोकशाहीचे मजबूत आधारस्तंभ असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त, जबाबदारी व कर्तव्यभावनेने वागून चांगले नागरिक बनावे, असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चुंचाळे येथील वाय. वाय. पाटील सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. डी. बी. मोरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Yavalnews /या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. संध्याबाई उज्जैनसिंग राजपूत, बाजार समिती सभापती श्री. उज्जैनसिंग राजपूत, ग्रामपंचायत उपसरपंच सौ. मायाबाई राजपूत, ग्रामपंचायत सदस्य श्री. भरत राजपूत, श्री. भारतीय राजपूत, सौ. दिपाली चौधरी, श्री. पितांबर चौधरी, पोलीस पाटील सौ. माधुरी राजपूत, अंगणवाडी सेविका सौ. रेणुका वानखेडे, आशा वर्कर सौ. सुनेना राजपूत, अंगणवाडी मदतनीस सौ. सुवर्णा राजपूत, तसेच श्री. नितीन राजपूत, श्री. संजय सिंग राजपूत, श्री. कैलास सिंग राजपूत, श्री. प्रदीप वानखेडे, श्री. विशाल राजपूत, श्री. खिचन चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत राष्ट्रीय सणाचा आनंद साजरा करून देशप्रेमाची भावना अधिक दृढ केली.








