Home वर्धा Crimenews /हिंगणघाट परिसरात गांजाची वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 1.55...

Crimenews /हिंगणघाट परिसरात गांजाची वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 1.55 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : अंमली पदार्थांच्या विरोधात वर्धा पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 55 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.hingnghatnews

वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

 

त्या अनुषंगाने 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, मुखबिरामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून जाम ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मौजा रिमडोह शिवारात, कोचर खरर्डा फॅक्टरीजवळ सापळा रचण्यात आला.wardhanews

यावेळी सुझुकी बर्गमन मोपेड (क्र. एमएच 32 ए.डब्ल्यू. 4877) वरून गांजाची वाहतूक करणारा आरोपी अब्दुल रिजवान उर्फ टोनी अब्दुल रज्जाक शेख (वय 30, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट) याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपीकडून 2 किलो 228 ग्रॅम गांजा तसेच मोपेड असा एकूण 1,55,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत सदर गांजा नागपूर येथील जावेद शेख (रा. ऑटोमॅटिक चौक, यशोधरा नगर) याच्याकडून पुरवठा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.hingnghatnews

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Crimenews /या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर व अभिषेक नाईक यांचा सहभाग होता.