सोनोशी पिंपरखेड या जंगलाच्या परिसरामध्ये आज सकाळी साडेआठच्या दरम्यान काही सुनील जायभाये आणि शुभम वाघमारे कामानिमित्त रस्त्याने जात असताना त्यांना परमेश्वर मुंडे यांच्या शेतालगत अस्वल आढळून आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या गहू शाळु यासारखी पिके काढणे सुरू असताना व काही ठिकाणी शेतीची नागरटी सुरू असताना अस्वल दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच या जंगलामधून सतत दुचाकी चार चाकी इत्यादी वाहने मोठ्या प्रमाणात चालू असतात जंगलाच्या मधून जाणारा हा रोड थेट सिदंखेडराजा जातो.

त्यामुळे प्रवासी वाहतुकीलाही आता धोका निर्माण झाला आहे या रोडवर सतत वाहनाची ये जा सुरू असते त्यामुळे अस्वल आढळल्याने आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.Forestnews/
सध्या उन्हाचा पारा चढत आहे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था जंगलामध्ये नाही व इतरही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे वन्य प्राण्यांची अशी भटकंती होताना दिसत आहे.

Aswalnews/त्यामुळे वनविभागाने या बाबीकडे विशेष लक्ष देऊन अस्वलाचा शोध घेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे असे मागणी होत आहे





![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)


