प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : काक्रोच जनता पार्टी, हिंगणघाटच्या वतीने वैद्यकीय, अभियांत्रिकी, सामाईक प्रवेश व शिक्षक पात्रता परीक्षांतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन सादर करण्यात आले.cockroach janata party news
निवेदनात पद्मश्री सन्मानित शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.
तसेच, देशातील विद्यार्थी व पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी प्रवेश व पात्रता परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष व उत्तरदायी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Wardhanews /शिक्षण व्यवस्था अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक पावले उचलावीत.



