Home Breaking News Nanded news/ इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा; आरोपींना कठोर शिक्षा...

Nanded news/ इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा; आरोपींना कठोर शिक्षा द्या

0
2

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

परभणी : नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील धनेगाव पेट्रोल पंपाजवळ माजी सैनिक बलजीतसिंग बावरी यांचा मुलगा इंद्रजीतसिंग बावरी यांच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परभणीतील दशमेश पी. जी. गुरु गोविंदसिंहजी सेवाभावी संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे.indrajitsingbawari

यासंदर्भात संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी, परभणी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. ८ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेडच्या दूध डेअरी परिसरातील धनेगाव पेट्रोल पंपावर इंद्रजीतसिंग बलजीतसिंग बावरी यांच्या हत्येची गंभीर घटना घडली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे समाजात आक्रोश, भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मृत इंद्रजीतसिंग बावरी यांच्या हत्येचे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याची निष्पक्ष, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे. नांदेड पोलिस विभागाच्या स्थानिक यंत्रणेऐवजी DIG दर्जाच्या वरिष्ठ व स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करून तपास करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.  Nandednews

निवेदनातील प्रमुख मागण्या

हत्येच्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी आरोपी, मुख्य सूत्रधार, कटात सहभागी व्यक्ती, सहकारी तसेच हत्येसाठी शस्त्र उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.policenews

तसेच तपासासाठी संबंधित अधिकाऱ्याला FIR, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल व इतर आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.sit

Nanded news/या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशीही मागणी संस्थेने केली आहे. तसेच परिसरातील सराईत गुन्हेगार व हिस्ट्रीशीटरांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here