Home बुलढाणा LatestNews/रेती ठेकेदार डॉ. केशव अवचार यांच्यावर मोठी कारवाई; १ कोटी ९२ लाखांचे...

LatestNews/रेती ठेकेदार डॉ. केशव अवचार यांच्यावर मोठी कारवाई; १ कोटी ९२ लाखांचे ६ टिप्पर जप्त, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची धडक कारवाई, बीबी पोलिसात गुन्हे दाखल!

 

​लोणार (खापरखेड लाड शिवार):बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यात प्रशासनाने गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. लोणारचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी एका संयुक्त धाडसत्रात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपये किमतीचे ६ अवजड टिप्पर रंगेहात पकडले आहेत.

या धडक कारवाईत प्रमुख रेती ठेकेदार डॉ. केशव अवचार यांच्यासह विविध वाहन मालक व चालकांवर बीबी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

BuldhanaUrban/३४ कोटी ७७ लाखांचा कथित आर्थिक घोटाळा; बुलढाणा अर्बनच्या अधिकाऱ्यांवर FIR!

BuldhanaUrban/३४ कोटी ७७ लाखांचा कथित आर्थिक घोटाळा; बुलढाणा अर्बनच्या अधिकाऱ्यांवर FIR!

 

​धाडसत्राची पार्श्वभूमी ​प्राप्त अधिकृत माहितीनुसार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:४५ वाजता लोणारचे उपविभागीय अधिकारी सानप साहेब, तहसीलदार पाटील साहेब, नायब तहसीलदार इप्पर साहेब, मंडळ अधिकारी सानप साहेब, ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव आणि महसूल सेवक पथकाने सरकारी वाहनाने खापरखेड लाड येथील हराज झालेल्या घाटावरील स्टॉक पाहणीसाठी धाव घेतली.

यादरम्यान, सकाळी ११:५५ वाजण्याच्या सुमारास खापरखेड लाड शिवारामध्ये रेती घाटावरून विनापरवाना व चोराने रेतीची वाहतूक करणारे एकूण ६ टिप्पर मिळून आले.

​जप्त केलेल्या वाहनांचा व खनिजाचा तपशील:-
​पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत जप्त करण्यात आलेल्या वाहनांची आणि गौण खनिजाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

1.)MH 28 BB 2130: ६ ब्रास रेती (किंमत ₹३६,०००) व वाहन (किंमत अंदाजे ₹१५,००,०००), मालक: दिलीप वायाळ, चालक: सोनु सुभाष आडे.

2)​MH 28 BB 6042: ६ ब्रास रेती (किंमत ₹३६,०००) व वाहन (किंमत अंदाजे ₹३५,००,०००), मालक: रवि बाबुराव जाधव.

3)​MH 28 BA 6042: ६ ब्रास रेती (किंमत ₹३६,०००) व वाहन (किंमत अंदाजे ₹३५,००,०००), मालक: रवि बाबुराव जाधव.

4)​MH 28 BX 7090: ६ ब्रास रेती (किंमत ₹३६,०००) व वाहन (किंमत अंदाजे ₹३५,००,०००), मालक: इम्रान शेख.

5)​MH 28 CF 0179: ६ ब्रास रेती (किंमत ₹३६,०००) व वाहन (किंमत अंदाजे ₹३५,००,०००), मालक: अरुण लाड.

6)​MH 28 BB 9925: ६ ब्रास रेती (किंमत ₹३६,०००) व वाहन (किंमत अंदाजे ₹३५,००,०००), मालक: डॉ. केशव अवचार, चालक: पंकज भुजंग भालेराव.

�एकूण ६ गाड्या आणि गौण खनिजाची मिळून एकूण किंमत ₹१,९२,१६,०००/- इतकी आहे.

​वैध कागदपत्रांचा अभाव आणि कायदेशीर गुन्हे दाखल
​घटनास्थळी वाहनांची व कागदपत्रांची तपासणी केली असता, कोणत्याही चालकाकडे किंवा मालकाकडे वैध रॉयल्टी (Royalty) किंवा परवानगी कागदपत्रे आढळून आली नाहीत. विचारपूस केली असता, सदर रेती ‘देवी जुळजाइ प्रा. लिमिटेड’चे मालक डॉ. केशव अवचार यांच्या स्टॉकवरून भरून आणल्याची माहिती समोर आली.

​NewsUpdate/या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव यांच्या फिर्यादीवरून बीबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४८(७) व ४८(८) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रेणुका दामोदर पदघन करत आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.