संग्रामपुर [ प्रतिनिधी ] प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरवट बकालच्या वतीने बस स्थानक पाणपोई या स्थळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन २२ मार्च सकाळी १० ते २ वाजे दरम्यान करण्यात आले असुन रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान करण्याचे आव्हाण प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे .
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे अहोरात्र गोर गरिब शेतकरी शेतमजुरांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर असतात ,अपंग निराधार अनाथ शेवटच्या घटकाचा आधार असलेले राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतुन प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरवट बकाल पदाधिकाऱ्याच्या वतीने बस स्थानक वरवट बकाल पाणपोई जवळ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केल्यास गरिब गरजु रुग्णांना जिवदान मिळेल रक्त संकलन करुन रक्त बॅक ठाकरे लॅब अकोला यांना पाठविण्यात येणार आहे परिसरातील युवकांनी रक्तदान शिबीर प्रसंगी उपस्थीत राहुन रक्तदान करावे असे आव्हाण प्रहार जनशक्ती पक्षचे पदाधिकारी तौसिफ जमदार अर्जुन सोळंके व प्रहार जनशक्ती मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



