जळगांव जामोद येथील घटना शेख कलीम शेख बिबन वनपाल दहा हजार रुपये लाच घेताना एसीपीच्या जाळ्यात अटकले ( acb trap )

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

acb trap:बुलडाणा : जळगाव जामोद तालुक्यात दि.६ 5/2024 शेख कलीम शेख बिबन वनपाल यांना १० हजार रुपयाची लाच घेतांना एसीबीने रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहिती नुसार, एका तक्रारदाराने वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक), जळगाव जामोद येथे दाखल वन गुन्ह्यामध्येतुन आरोपीला सुटका करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागितली होती.

तक्रारदारास लाच देणे मंजूर नसल्याने त्याने एसीबी कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीवरून दि.६ मे रोजी आरोपी लोकसेवक यांची पंचासमक्ष लाज मागणीबाबत पडताळणी केली असता लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयाची मागणी करून लाज रक्कम स्वीकारण्याची संमती दिली.

आपलं या चुका मुळे मोबाईल लवकर होईल खराब तर आजच या चुका टाळा ( mobaile )

त्यावरून दि. ६ मे रोजी कारवाई आयोजीत केली असता आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष लाज रक्कम स्वीकारल्यावरून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

शेख कलीम शेख बिबन, वय ४८ वर्षे, पद- वनपाल (वर्ग-३), वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक), जळगाव जामोद रा. उमाळी ता. मलकापूर जि. बुलढाणा ह.मु. कृष्णा नगर, जळगाव ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा अशे या आरोपीचे नाव आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

acb trap:आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, स. फौ. शाम भांगे, पोहेकॉ. प्रवीण बैरागी, पो ना विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकॉ रंजीत व्यवहारे, चालक पोना नितीन शेटे, चालक पो कॉ अरशद शेख लाप्रवि बुलढाणा यांनी पार पाडली.

Leave a Comment