Amarkale /शॉर्टसर्किटमुळे दांडेकर कुटुंबाचे घर जळून खाक – खासदार अमर काळेंनी केली पाहणी, तातडीने मदतीचे निर्देश

0
21

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – तालुक्यातील वडनेर गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या शॉर्टसर्किटच्या भीषण घटनेत दांडेकर कुटुंबाचे घर पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत घरातील फर्निचर, कपडे, धान्य, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे, वीज उपकरणे यासह सर्व घरगुती साहित्य जळून गेले असून कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे यांनी तातडीने दांडेकर कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याच्या आणि आवश्यक ती आर्थिक मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

Amarkale /यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, युवक प्रदेश संघटक संदीप किटे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, मिलिंद कोपुलवार, अनिल कोंबे, नामदेव राऊत, युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, प्रवीण कलोडे, गुरुद्याल सिंग जुनी, पंकज मानकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here