अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल..( amravtinews )

——————————-
प्रतिक कुऱ्हेकर. अकोला

amravtinews :अमरावती:-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२४ च्या काही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये बी. ए. सेमी-१ (सीबीसीएस), एमएस्सी (जिओइन्फॉरमॅटिक्स) एस-४ (सीबीसीएस-नवीन) (सुधारित), एमएस्सी (होम सायन्स) (सर्व शाखा) सेमी-४ (सीबीसीएस) (सुधारित),

बीएड सेमी- २ (नवीन), एम. ई. (एफ.टी.) (सीबीसीएस) सेमी-२ (इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम इंजिनिअरिंग) आणि बीपीएड् एस-१ (नवीन), एम. पी. एड. एस-१ (नवीन) या परीक्षांचा समावेश आहे

यासंदर्भात विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली असून तव्दतच सर्व संबंधित महाविद्यालयांनाही कळविण्यात आले आहे. महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे.

एल.टी.टी ते थिविम जादा रेल्वेची सुविधा.( rail news )

तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

amravtinews:अधिक माहितीकरिता त्यांच्याशी ९७६३८३३९६९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Comment