एल.टी.टी ते थिविम जादा रेल्वेची सुविधा.( rail news )

 

‘कोकण रेल्वे’ प्रशासनाचा निर्णय उन्हाळी हंगामात प्रवाशांना आधार..

प्रतिक कुऱ्हेकर. अकोला

rail news :मुंबई (वि. प्रतिनिधी):-उन्हाळी हंगामामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष गाडी धावणार आहे. लोकमान्य टिळक (एलटीटी) ते थिविम, अशी ही जादा गाडी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

गाडी क्र. ०११८७ लोकमान्य टिळक (एलटीटी) ते थिविम विशेष साप्ताहिक गाडी एलटीटी येथून १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वा. थिविमला पोहोचेल.

1 मे पासून आता वनप्लसचे मोबाईल मिळणार नाही शॉपीमध्ये ( oneplus mobaile )

परतीसाठी गाडी क्र. ०११८८ थिविम ते लोकमान्य टिळक विशेष साप्ताहिक गाडी १९ एप्रिल ते ७ जून पर्यंत दर शुक्रवारी थिविम येथून सायंकाळी ४.३५ वा. सुटेल.

ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक येथे पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच गाडी क्र. ०११२९ एलटीटी ते थिविम विशेष साप्ताहिक एलटीटी येथून २० एप्रिल ते ८ जून पर्यंत दर शनिवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०११३० थिविम ते एलटीटी ही गाडी थिविम येथून २१ एप्रिल ते ९ जून पर्यंत दर रविवारी सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल. या गाडीचे तिकिट बुकिंग १३ एप्रिलपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली, इंटरनेट आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
——————————–
कोकण रेल्वेचा गुरुवारी मेगाब्लॉक…

कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव ते कुमटा या विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक १८ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत आहे. मडगाव कुमटा विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी तीन तासांचा मेगाब्लॉक चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे.

rail news :गाडी क्र. ०६६०२ मंगळुरु सेंट्रल ते मडगाव विशेष गाडीचा प्रवास १८ रोजी कारवार स्थानकावर अल्पावधीत थांबेल. तसेच कारवार ते मडगाव विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. गाडी क्र. ०६६०१ मडगाव ते मंगळुरू सेंट्रल या गाडीचा प्रवास १८ रोजी कारवार स्थानकापासून नियोजित वेळेवर सुरू होईल. मडगाव ते कारवार विभागादरम्यान अंशतः रद्द होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Comment