API कडून PSI महिलेवर अत्याचार, API कडून सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. PSI महिलेला ठार मारण्याचा प्रयन्त

 

SURYA MARATHI NEWS

पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवत सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. व या
खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एपीआय वर गुन्हा पन दाखल करण्यात आला आहे. व पुण्यातच काम करणाऱ्या 33 वर्षीय पीएसआय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. की
हरीश सुभाष ठाकूर (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. व त्यांच्याविरोधात भा द वि 307, 494, 498, 377, 506 सह पॉक्सो कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार 2013 पासून वारंवार घडला. आहे व
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हरीश सुभाष ठाकूर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे पोलिस दलात काम करतात. 2013 मध्ये त्यांनी फिर्यादी महिलेला आपला पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगितले आणि त्यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत वेळोवेळी त्यांच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. व त्यांच्या पाच वर्षीय मुलासमोर देखील त्याने अनैसर्गिक संबंध ठेवल्याची फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. की या दरम्यान 2015 मध्ये आरोपी ने नवी मुंबई येथील राहते घरात फिर्यादी वर सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यामध्ये फिर्यादीच्या बोटाला जखम झाली. आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने इतके दिवस पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु लग्नाची नोंदणी करण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानंतर फिर्यादीने शेवटी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. व खडकी पोलिसांनी या प्रकरणी चौकसी करून गुन्हा दाखल केला असून पुढील अधिक तपास सुरू आहे

Surya marathi news

Leave a Comment