महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; १३ लाख २२ हजारांची रोकड घेऊन चोरटे कारमधून पसार ( ATMnews)

 

( सूर्या मराठी न्यूज डेस्क )

मोताळा नांदुरा मार्गावरील शेंबा येथील महराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात टोळीने फोडल्याने पोलीस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.ATMnews

तेरा लाख बावीस हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

आयशर कारच्या धडकेत एक ठार; तीन जखमी लव्हाळा मेहकर मार्गावर झाला अपघात ( accdent news )

सुरक्षा यंत्रणेमुळे (अलर्ट अलार्म) बोराखेडी पोलीस अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. चोरांच्या टोळीने वापरलेल्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला.

मात्र कार चा वेग जास्त असल्याने चोरटे पसार होण्यात सफल झाले. ते खैरा- नांदुराच्या दिशेने पसार झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

प्राप्त माहितीनुसार शेंबा येथील मुख्य रस्त्यावर महाबँकेचे एटीएम आहे. आज रविवारी पहाटे चार वाजताच्या आसपास ते फोडण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रथम दर्शनी अंदाजानुसार ‘गॅस कटर’च्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील मोठी रक्कम घेऊन चोरांची टोळी पसार झाली. एटीएम संबधित सुरक्षा यंत्रणा (सिक्युरिटी अलर्ट) मुळे पोलिसांना एटीम फोडल्याची माहिती मिळाली.

यानंतर नजीकच्या पोलीस ठाण्याचे पोलीस दल व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत चोर रोख घेऊन घेऊन पसार झाले होते.

ATMnews:सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोर कार चा वापर केल्याचे आढळून आले. परिसरसह जिल्ह्यात पोलिसानी नाकाबंदी केली आहे.

Leave a Comment