Breaking news | रेल्वे रोको पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात ! बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Breaking news: बुलढाणा : पोलीस कारवाई टाळण्यासाठी भूमिगत झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी राजूर घाटातून आज संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतले.

त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाण्यासमोर तुपकरांचे कार्यकर्ते जमले असून घोषणाबाजी करीत असल्याने तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

१९ जानेवारीच्या मलकापूर रेल्वे स्थानकात आयोजित रेल्वे रोको साठी जातांना पोलिसांनी राजुर घाटातून ताब्यात घेतले. संभाव्य कारवाई लक्षत घेता भूमिगत झालेले तुपकर नवीन वाहनातून आज संध्याकाळी मलकापूर कडे रवाना झाले.

बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटात करडी नजर ठेवून असलेल्या बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना पावणे आठ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना कडेकोट बंदोबस्तात शहर ठाण्यात आणण्यात आले.

Crimenews | बसच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू ! शेवटी संतप्त जमावाने बस पेटवली.. या तालुक्यातील घटनेने खळबळ

याची वार्ता पसरताच कार्यकर्ते ठाण्यासमोर जमा झाले.त्यांनी घोषणबाजी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. तिथे कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यांची रात्र ठाण्यातच जाण्याची शक्यता आहे.

कलम १५१अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे.
आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव असून पोलिसांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे असा आरोप रविकांत तुपकरांनी यावेळी केला आहे.

 

Breaking news: मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचे रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.

Leave a Comment