भुसावळ शहरात रात्री गोळीबार :, दोन ठार..संतोष बारसे, सुनील राखुंडे यांच्यावर झाडल्या गोळ्या.( brekingnews )

0
0

 

विकी वानखेडे सह प्रतीक कुऱ्हेकर भुसावळ

संतोष बारसे यांचे वडील मोहन पहेलवान यांच्यावर देखील जुलाई 2015 मध्ये असाच हल्ला झाला.

• माझी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे यांचे पती संतोष बारसे गोळीबारात ठार.
———————————-

brekingnews:जळगाव :-भुसावळ शहरात बुधवारी रात्री ९.४५वा. घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे दोघे ठार झाल्याचे वृत्त आहे. जळगाव नाक्यावर मरीमाता मंदिराजवळ अज्ञातांनी हा गोळीबार केला. घटनेच्या वेळी दोघेही कारमधून भुसावळकडे प्रवास करत होते.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

संतोष बारसे हे माजी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे यांचे पती आहेत. ते राखुंडे यांच्यासोबत कार क्रमांक एम.एच.१९- पी.जी. ०१८७ ने जळगाव नाका येथून जात होते.

त्याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. चालकाच्या बाजूने दोघांवर गोळीबार झाला आहे. ही कार सुनील राखुंडे हे चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यानंतर शहरात पळापळ सुरू झाली आणि दुकाने तातडीने बंद करण्यात आली.
ही घटना कळताच शहर पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले हल्ला झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी तातडीने डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात नेले.

brekingnews:मात्र या हल्ल्यात बारसे आणि राखुंडे हे दोन्ही जण ठार झाल्याच्या वृत्ताला डॉ. राजेश मानवतकर यांनी दुजोरा दिला आहे. संतोष बारसे यांचे वडील मोहन पहेलवान यांच्यावरदेखील जुलै २०१५ मध्ये कन्या शाळेच्या मैदानाजवळ हल्ला झाला होता.
———————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here