अज्ञात ट्रकच्या धडकेत ;दुचाकीस्वार जागीच ठार.( brekingnews )

0
3

 

प्रतिक कुऱ्हेकर. अकोला

brekingnews:मूर्तिजापूर :-भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला,ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या दरण्यान मूर्तिजापूर – दर्यापूर राज्य महामार्गावर दुर्गवाडा फाट्याजवळ घडली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

भरधाव वेगाने एका ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे, ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान मूर्तिजापूर – दर्यापूर राज्य महामार्गावर दुर्गवाडा फाट्याजवळ घडली.

अपघाता मधील मृतक बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा पळसोळा येथील सोनू मुरलीधर राऊत अंदाजे वय (३५ ) वर्ष असून आपल्या दुचाकी क्र. एम.एच. ३०- ए. डब्ल्यू ४९६२ ने मूर्तिजापूर वरून दर्यापूर च्या दिशेने जात असतांना विरुद्ध दिशेने दर्यापूर हुन मूर्तिजापूर कडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रेकाने दुचाकीला जबर धडक दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या वेळी लगेच अन्य वाटसरूंनी संत गजानन महाराज आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर, बादशहा, अमोल खंडारे व मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती देऊन पाचरण केले.

brekingnews:पुढील उत्तरीय तपासणी करीता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला तर अपघाताचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस करीत आहे.
———————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here