ज्युनिअर बुलढाणा जिल्हा बॉलबॅडमिंटन संघाची घोषणा
शेगांव येथे होणार ज्युनियर राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र बालबॅडमिंटन असोसिएशन व बॉलबॅडमिंटन स्पोर्टस असोसिएशन बुलढाणा व माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे दिनांक २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ज्युनिअर राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असो बुलढाणा चे सचिव व महाराष्ट्र बॉलबॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार विजय पळसकर यांनी नुकतीच केली.
नुकत्याच संपन्न झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा संघ तयार करण्यात आला असून हा संघ शेगांव येथील ज्युनिअर राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे . मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी मलकापूर येथील अक्षय चव्हाण तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी शेगाव येथील कुमारी ईश्वरी सहस्त्रबद्ध यांची नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष निलेश महाजन व उपाध्यक्ष राजेश्वर खंगार यांनी नुकतीच केली असुन संघ पुढीलप्रमाणे
मुली संघ
1) ईश्वरी गुलभेले कर्णधार
2) श्रुती गजानन तिजारे
3) आदिती पंकज टावरी
४) तृप्ती संतोष वाणे
५) स्नेहा रवींद्र अवचार
6) अनुजा संतोष पवार
७) तनवी गोवर्धन पाटील
८) यशिका महेश पंजवाणी
९) स्मिता विलास पहुरकर
१०)खुशी मिलिंद जाधव
प्रशिक्षक :- प्रा कैलास पवार व्यवस्थापक:- आकाश ताराडे
मुले संघ
१)अक्षय चव्हाण कर्णधार
२) सौरभ चव्हाण
३) लोकेश चांडक
४) सिंद्वेष बाबर
५) सचिन दिवाने
६) वैभव वसत्कार
७) अनुज हागे
८) प्रणव प्रवीण कडाळे
९) आयुष श्रीकृष्ण पाटील
१०) आदित्य धामोडकर
प्रशिक्षक विश्वजीत सिंह ठाकुर
व्यवस्थापक राजेश्वर खंगार
सदर जिल्हा संघाचे प्रशिक्षण शिबिर दि.२२ ते २६ ऑक्टोबर पर्यंत माऊली स्कूल ऑफ स्कॉलर शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणार असून निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असो.बुलढाणा चे सचिव विजय पळसकर यांच्याशी संपर्क साधावा असे संघटनेतर्फे आव्हान करण्यात आले आहे. Buldhana